राज्यात अवकाळी पावसाचं थैमान, गारपीट, पावसानं बळीराजा पुन्हा संकटात
थंडीतही पुन्हा पाऊस! गारपीटमुळे बळीराजा चिंतेत, या जिल्ह्यात पुन्हा पावसाचा अलर्ट
मुंबई : राज्याला पुन्हा गारपिटीनं तडाखा दिला आहे. औरंगाबादचया वैजापूर तालुक्यतील अनेक गावांना मुसळधार पावसाने आणि गारपिटीने तडाखा बसला आहे. वैजापूरच्या देवगाव ,शनि चेंडूफळ, बाजाठाण , गाढेपिंपळगाव, मांजरी फाटा , आणि गंगापुर मध्ये गारपीट आणि पाऊस झाला. तर कन्नड आणि पैठणमध्ये ही तुफान पाऊस झाला.
विदर्भातही अवकाळी पावसानं थैमान घातलंय. अमरावतीच्या चांदुर बाजार तालुक्याला सकाळीच पाऊस आणि गारपीटीनं झोडपून काढलं. वणी बेलखेडा आणि घाटलाडकी परिसरात तुफान गारपीट झाली. या गारपिटीने संत्र्याचा आंबिया बहार हातातून जाण्याची शक्यता आहे.
तूर, हरभरा, कांदापिकालाही गारपीटीचा फटका बसण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात गारपीट झाली. नरखेड तालुक्यातील वाढोना आणि मेंढला परिसरात गारपीट झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे. उशिरा लागवड केलेल्या फुलोरा अवसतेत असलेल्या तूर आणि हरभरा पिकांसाठी हा पाऊस नुकसानदायी आहे. आणखी दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात डिसेंबर अखेर पावसाची शक्यता हवामान खात्याने दर्शवली होती. आज अकोल्यात दुपारी चारच्या सुमाऱ्यास पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसासह गारपीट झाल्याने शेती आणि पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे अंदाज बांधले जात आहे. मात्र हा पाऊस कापूस , तूर यासाठी नुकसानदायक असला तरी हरभरा आणि गहू पिकांसाठी काहीसा फायदेशीर असल्याचं मानलं जातं आहे. उशिरा लागवड केलेल्या फुलोरा अवसतेत असलेल्या तूर आणि हरभरा पिकांसाठी हा पाऊस नुकसान करणारा आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार ऐन हिवाळा सुरु झालेला असतानाच आज सकाळी भंडारा गोंदिया जिल्ह्यात गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अवकाळी पावसाचा फटका रब्बी हंगामातील धान पिका सह अन्य पिकांना फटाका बसणार असून जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून आता थंडीचाही जोर वाढणार आहे.
नागपूर जिल्ह्यात गारपीट झालेली आहे. नरखेड तालुक्यातील वाढोना आणि मेंढला परिसरात गारपीट झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे. अवकाळी पावसानं संत्रा फळबागेचं नुकसान झालं आहे. दुपारच्या सुमारास झालेल्या या पावसानं बळीराजा धास्तावला आहे. हवामान विभागाने विदर्भात दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे.