नाशिक जिल्ह्यातही थंडीचा कडाका वाढला
नाशिक जिल्ह्यातही थंडीचा कडाका जाणवायाला लागला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून निफाड परिसरात पारा घसरु लागलाय.
नाशिक : दमदार पावसानंतर राज्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. नाशिक जिल्ह्यातही थंडीचा कडाका जाणवायाला लागला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून निफाड परिसरात पारा घसरु लागलाय. निफाडचं तापमान 10.2 अंशावर गेलंय. हे तापमान गहू आणि हरभरा अशा रब्बी पिकांना लाभदायक आहे.
द्राक्ष बागांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता
मात्र थंडीचा कडाका वाढला तर या परिसरातील द्राक्ष बागांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील शेतक-यांमध्ये गहू उत्पादक शेतकरी आनंदात आहे तर द्राक्ष उत्पादक शेतक-याची चिंता वाढली आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यात दरवर्षी थंडीचा कडाका वाढतो