नागपूर : कौटुंबिक मित्र असलेल्या एका कडून होणाऱ्या सततच्या अश्लील शेरेबाजीमुळे मानसिक दडपणातून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागपुरात घडलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पल्लवी नागुलवार असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून तिचे पती आर्किटेक्चर आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.


आत्महत्येपूर्वी पल्लवीने सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईड नोटमध्ये अविनाश घुसे याच्यासह सहा जणांमुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. 


या सुसाईड नोटच्या आधारे अंबाझरी पोलिसांनी अविनाश घुसे, त्याची पत्नी हर्षा घुसे, संजय महाकाळकर, राकेश तिडके, पंकज पवार आणि संजय गील्लुरकर यांचाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी संजय महाकाळकर हे काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आहेत तर इतर बांधकाम व्यावसायिक आहेत.