कोल्हापूर : कचरा पेटवताना सॅनिटायरच्या बाटलीचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कागल तालुक्यातील बोरवडे येथे 27 डिसेंबरला ही घटना घडली होती. आज उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सॅनिटायरच्या बाटलीचा स्फोट होऊन सॅनिटायझर अंगावर उडल्याने महिला 80 टक्के भाजली होती. सुनिता काशीद असं या महिलेचे नाव आहे.


कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणं आवश्यक आहे. पण हे वापरत असताना काळजी घेणं देखील महत्त्वाचं आहे. सॅनिटायझर हे ज्वलनशील असल्याने ते हाताळताना सावध राहण्याची गरज आहे. 


सॅनिटायझर सुरक्षित ठिकाणी ठेवावे. हाताला लावल्यानंतर काही वेळ काळजी घ्यावी. घरात सॅनिटायझरची फवारणी केल्यानंतर लाईट गेली म्हणून मेणबत्ती पेटवली असता आगीचा भडका उडाल्याची घटना याआधी वडाळा येथे घडली होती. 


इतर बातमी : गॅस गिझर वापरताय तर सावधान...