नितेश महाजन, झी मीडिया, जालना : धावत्या रेल्वेत महिलेची प्रसूती झाली आहे (Woman gives birth to baby in train ). रेल्वेतूनच प्रवास करणाऱ्या डॉक्टर महिलेने केली प्रसूती. यामुळे मराठवाडा एक्सप्रेसमध्ये (Marathwada Express) बाळाचा जन्म झाला आहे.  बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. या महिलेवर छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेड ते मनमाड दरम्यान धावणार्‍या मराठवाडा एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करणार्‍या एका गरोदर महिलेची रेल्वेतच प्रसुती झाली आहे. रविवारी सकाळी जालना ते करमाड दरम्यान ही घटना घडली आहे. प्रियंका आदीक असे रेल्वेच प्रसूती झालेल्या महिलेचे नाव आहे. 


प्रियंका नांदेड ते छत्रपती संभाजीनगर रेल्वेनं प्रवास करीत होती. जालना रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर प्रियंकाला अचानक प्रसुतीच्या वेदना सुरु झाल्या. बदनापुर रेल्वे स्टेशन जवळ येत असतांना तीच्या वेदना अधिक तिव्र झाल्या. त्यामुळे याच रेल्वेतून प्रवास करत असलेल्या महिला प्रवाशांनी तीला सुरक्षा देत प्रसुतीसाठी मदत केली. त्यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी धावाधाव सुरु केली. 


या रेल्वेतून कुणी डॉक्टर आहे का याची माहिती घेत फिरले. याचवेळी त्याच रेल्वेत डॉ. अश्विनी इंगळे या नांदेड वरुन छत्रपती संभाजीनगर साठी प्रवास करीत होत्या. त्यांना या महिलेची माहिती दिली असता त्या तात्काळ गरोदर महिलेची प्रसुती करण्यासाठी धावल्या. 


जवळ असलेल्या मोजक्याच साहित्याच्या मदतीने त्यांनी या महिलेची प्रसूती यशस्वीपणे पार पाडली. यानंतर प्रियंका यांना छत्रपती संभाजीनगर मधील मुकंदवाडी स्टेशन येथून रुग्णवाहीकेतून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.