कोल्हापूर : अतिशय धक्कादायक प्रकार कोल्हापूरच्या शास्त्रीनगरमध्ये घडला आहे.   एका महिलेची तिच्या शेजारीच राहणाऱ्या १६  वर्षीय अल्पवयीन मुलाने हत्या केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३५ वर्षीय महिलेचं नाव पूजा रुपेश महाडिक असं असून शास्त्रीनगरमधील द पॅराडाईज अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर पूजा महाडिक कुटुंबसोबत राहत होत्या. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास शेजारच्या फ्लॅटमधील १६ वर्षीय मुलासोबत पूजा महाडिक यांचा वाद झाला. हा वाद शांत झाल्यानंतर संध्याकाळी आरोपी मुलगा क्लासला जातो असं सांगून गॅलरीतून महाडिक यांच्या फ्लॅटमध्ये घुसला.


यावेळी त्याने बेसावध पूजा यांच्यावर चाकूने सपासप वार करायला सुरुवात केली. मुलाने पूजा महाडिक यांच्या मुलीसमोरच हल्ला केला. पूजा यांचा प्रतिकार अयशस्वी ठरला आणि त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर मुलगाही तिथेच बेशुद्ध झाला. रुग्णालयात उपचार करुन, शुद्धीत आल्यावर त्याता ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


पण या मुलाने राग अशा पद्धतीने व्यक्त केला म्हणून सगळीकडेच खळबळ माजली आहे. १६ वर्षाच्या तरूणाचा रागावर अजिबात नियंत्रण नसल्याचं देखील समोर आलं आहे.