आमच्या घराकडे का बघते? म्हणत वृद्धाने केली महिलेला अमानुष मारहाण; VIDEO व्हायरल
Nashik Crime News: नाशिक जिल्ह्यात एक भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. महिलेला अनामुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
नाशिकः वृद्धाने महिलेच्या छातीवर बसून केली अमानुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार मालेगाव (Malegaon) तालुक्यातील सोयगाव येथे घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत. तर, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. किरोकोळ वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
'आमच्या घराकडे का बघते', अशी कुरापत काढून एका वृद्ध व्यक्तीने गावातीलच 45 वर्षांच्या महिलेला जबर मारहाण केली. तसंच, तिचा विनयभंग केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत रस्त्यावर एक वृद्ध व्यक्ती महिलेला मारहाण करत आहे. अक्षरशः केसांना पकडून रस्त्यावर खेचत असल्याचे दिसत आहे. तर, महिलेच्या छातीवर बसून मारहाण करत तिचा विनयभंग केला आहे. या घटनेने परिसरात एकच संताप व्यक्त होत आहे.
वृद्ध व्यक्ती महिलेला मारहाण करत असताना तिला सोडवण्यासाठी गेलेल्या गेलेल्या पिडीत महिलेच्या भावाला व आईला संशयित आरोपीच्या कुटूंबातील 5 ते 6 सहा जणांनी मारहाण केली. याप्रकरणी पिडीत महिलेला व कुटुंबीयांना मारहाण करणाऱ्या 6 जणांविरुद्ध कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, गावातीलच काही व्यक्तींनी पुढे येऊन हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
नाशिकमध्ये महिलेचा खून
नाशिकच्या सातपूर येथील विधाते मळा या परिसरात परप्रांतीय महिलेची गळा चिरून हत्या केल्याची घटना सोमवारी घडली होती. हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. जमिनीच्या वादातून चुलत सासऱ्यानेच सुनेला संपवले आहे. गावाकडील जमिनीचा वाद विकोपाला गेल्याने चुलत सासऱ्यानेच आपल्या चुलत सुनेचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मूळच्या मध्य प्रदेश आणि सध्या सातपुर येथे राहणाऱ्या अशोक्तीबाई शनीदयाल बैगा या परप्रांतीय महिलेची सोमवारी सकाळी हत्या झाली होती. सोमवारी सकाळी पती कामावर गेल्यानंतर अवघ्या काही तासातच अशोक्तीबाई यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. त्यामुळं परिसरात एकच खळबळ माजली होती.