Trending Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल (Social Media Viral Video) होत असतात. सोशल मीडियाचा बहुतांशी व्हायरल व्हिडीओसाठी वापर होतो, असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही. यामुळे अनेक टॅलेंन्टेड व्यक्तींना समोर येण्याची संधी मिळते. भारतात टॅलेंटची (Talent) काही कमी नाही. मात्र, त्याला पुरेसं खत पाणी मिळतंच असं नाही. त्यामुळे टॅलेंटची कदर नाही रे.., अशी ओरड नेहमी ऐकायला मिळते. अशातच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video Of Women) होत आहे. (woman singing lata mangeshkar song suno sajna papihe ne at panchgani parsi point video goes viral marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेला व्हिडीओ महाराष्ट्रातील असल्याचं पहायला मिळतंय. महाबळेश्वरमधील (Mahabaleshwar) एका वृद्ध महिलेचा हा व्हिडीओ असल्याचं पहायला मिळतंय. महाबळेश्वरच्या रस्त्यावर एका महिलेने लता मंगेशकर (lata mangeshkar song) यांचं 'सुनो सजना पापीहे ने' हे गाणं (suno sajna papihe) गात आहे, त्याचा हा व्हिडिओ ऑनलाईन व्हायरल होताना दिसतोय.


आणखी वाचा - Video : एका मुलासाठी दोन तरुणींची रस्त्यावर जोरदार हाणामारी, पाहा पुढे काय झालं ते...


सय्यद सलमान नावाच्या युजरने हा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instragram Video) शेअर केला आहे. आये दिन बहार हा चित्रपट 1966 साली आला होता. या चित्रपटातील गाणं ही वृद्ध महिला गुणगुणताना दिसत आहे. महिलेचा आवाज इतका मधुर आहे की, अनेकांच्या भूवया उंचावल्या आहे. खुप सुंदर आवाज महिला गाणं म्हणताना दिसत आहे.


पाहा Video -



दरम्यान, महाबळेश्वरच्या पाचगणी (Panchagani) येथील पारसी पॉईंटवर (Parsi Point) महिला उभी आहे. इंटरनेटवर शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ 6 लाखांहून अधिक वेळा पाहिला आहे. तसेच अनेकांनी हा व्हिडीओ शेअर देखील केलाय. सोशल मीडियावर अनेकांनी महिलेचं कौतूक देखील केलंय. तर काहींनी ही महिला दुसरी रानू मंडल (Ranu Mandal) तर नाही?, असा सवाल विचारून गरिब महिलेची थट्टा केल्याचं पहायला मिळतंय.