जिम सुरु झाल्याचा आनंद, झिंगाट गाण्यावर पुण्यातील महिलेचा साडी नेसून वर्कआऊट, व्हिडिओ तुफान व्हायरल
पुण्यातील महिलेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला आहे. यामुळे राज्य सरकारने काही निर्बंध शिथिल केले असून अनेक व्यावसायांना परवानगी दिली आहे. अनलॉक अंतर्गत राज्यात जिमही सुरु झाल्या आहेत. यामुळे नियमित जिममध्ये जाणाऱ्यांना आनंद झाला आहे.
पण सर्वाधिक आनंद झाला आहे तो पुण्यातील एका महिलेला. या महिलेने चक्क साडी नेसून झिंगाट गाण्यावर वर्कआऊट केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत असून या महिलेचं खूप कौतुक करण्यात येत आहे.
व्हिडिओ
कोण आहे ही महिला?
डॉ. शर्वरी इनामदार असं या महिलेचं नाव असून त्या आहारतज्ज्ञ आहेत. पुण्यात राहणाऱ्या डॉ. शर्वरी नियमित जिममध्ये वर्कआऊट करतात. लॉकडाऊननंतर जिम सुरु झाल्याचा आनंद त्यांनी व्हिडिओतून व्यक्त केला आहे. जिम सुरु झाल्याचा आनंद... असं या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिलं आहे.