सांगली : सांगली जिल्ह्यातील वज्रचौंड येथे विवाहितेने तीन मुलीसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली आहे. पोलिसांच्या हाती चारही मृतदेह सापडले आहेत. सुनिता सुभाष राठोड असं आत्महत्या केलेल्या ३२ वर्षीय विवाहितेचं नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनिताच्या दोन जुळ्या मुली आशा आणि उषा (वय ४) आणि ऐश्वर्या (वय २) असं मृत चिमुरड्यांची नावं आहेत. कौटुंबिक वादातून सुनितानं आत्महत्या केली असावी, असा  संशय आहे.


राठोड हे कुटुंबीय मूळचे कर्नाटकातील विजापूर येथील असून, रस्त्याच्या कामासाठी मजूर म्हणून गेली काही महिने ते तासगाव तालुक्यात आले होते. रविवारपासून सुनीता सुभाष राठोड आणि त्यांच्या तीन मुली बेपत्ता होत्या. 


आज सकाळी विहिरीत त्यांच्या चप्पला तरंगताना शेजाऱ्यांना दिसल्या. त्यांनतर सुनिता सुभाष राठोड हिने मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचं उघड झाले. 


आज सुरुवातीला दोन मुलींचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर सुनिता आणि एका मुलीच्या मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीय.