COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे : विरारमध्ये तीन महिला चोरांनी अर्धनग्न होऊन भर रस्त्यात धुमाकूळ घातला आहे. धुमाकूळ घालणाऱ्या तीन महिला चोरांना नागरीकांनी पाठलाग करून पकडले आहे. पण नागरिक पाठलाग करत असल्याचे पाहून या महिला चोरांनी चक्क आपले कपडे उतरवून अर्धनग्न पळायला सुरुवात केली.  पण तरीही या तिघींनानाही पकडून विरार पोलिसाच्या ताब्यात दिले आहे. विरार पूर्व वावटे वाडी येथे या तीन महिला चोर सकाळी सातच्या सुमारास चोरी करण्यासाठी आल्या होत्या. 


अर्धनग्न झाल्याने नागरिक घाबरले


स्थानिकांच्या लक्षात आल्यावर त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण रस्त्याने पळत सुटल्या होत्या त्यातच एका महिला अर्धनग्न झाल्याने नागरिक घाबरले होते. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते मनीष राऊत यांनी पुढाकार घेऊन, शेवटी अर्धा किलोमीटर पाठलाग करून या तीनही महिला चोरांना पकडले आहे. 


सीसीटीव्हीमध्ये महिला चोर कैद


याच महिलांनी 12 मार्च रोजी राऊत यांच्या घरी चोरी केली असल्याचे त्याचे म्हणणे आहे,  आणि त्या cctv कैद झाल्या होत्या. त्यामुळे आज त्या दिसताच त्यांना पकडून विरार पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले आहे.