मुंबई : राज्यात कोरोना काळात पुन्हा एकदा आरोग्य सेवेवर ताण आला आहे. कारण आशा सेविकांनंतर आता राज्यातल्या परिचारिकांनीही कामबंद आंदोलन (Nurses Strike) सुरू केले आहे. आज मुंबईतल्या सेंट जॉर्ज रूग्णालयातील परिचारिकांनी रूग्णालय आवारात निदर्शने केली. असेच आंदोलन सोलापूर, परभणी लातूरसह अनेक जिल्ह्यात झाले. त्यामुळे येथील आरोग्य व्यवस्थेवर परिमाण झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिचारिकांची कायमस्वरूपी पदभरती करावी, साथरोग विभागात अविरत देणाऱ्यांना 7 हजार 200 रुपये जोखीम भत्ता द्यावा, कोरोना बळी ठरलेल्या परिचारिकांना 50 लाखांचा विमा द्यावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह 13 मागण्यांसाठी परिचारिकांनी हे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाची दखल घेतली नाही  तर 23-24 जून रोजी दिवसभर काम बंद आंदोलन आणि 25 जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे. 



कोरोनाच्या काळात जीवावर उदार होऊन काम केले. राज्यातील 72 हजार आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना राज्य सरकारकडून काहीही दिले नाही. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मास्क, हातमोजे, सॅनिटायझर आदी मिळाले. मात्र, आता वर्षभरात अनेक ठिकाणी काहीच दिले जात नव्हते. काही ठिकाणी यातील वस्तू अर्धवट मिळाल्यात. साधारण 8 ते 12 तास काम करुनही काय मोबदला मिळाला. आमच्या आरोग्याची काळजी कोणीही घेतली नाही. आम्ही घरघरो जाऊन काम केले. मात्र, पदरी निराशा मिळाली, अशी खंत आशा सेविकांनी व्यक्त करत आंदोलन सुरु केले आहे. आमच्या मागण्या मान्य करावे म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत, असे आशा सेविकांनी सांगितले.