World`s Best School : जगातील टॉप 10 स्कूलमध्ये महाराष्ट्रातल्या 3 शाळांचा डंका, मुंबईतील दोन आणि एक...
World`s Best School Award 2023 : जगातील सर्वश्रेष्ठ शाळांच्या यादीत वेगवेगळ्या कॅटेगरीतून टॉप 10 शाळांची निवड करण्यात आली आहे. सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे तीन शाळा या महाराष्ट्रातील आहेत. देशातील पाच शाळांची निवड करण्यात आली आहे. यात एक शाळा दिल्लीतील सरकारी स्कूल आहे. तसेच गुजरातमधील खासगी आंतरराष्ट्रीय स्कूलचा समावेश आहे.
World's Best School Prize 2023 : 2023 चे जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार जाहीर झाले आहेत. यावर्षी भारतीतील पाच शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रातील शाळांचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील तीन शाळांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कारच्या माध्यमातून तब्बल अडीच लाख डॉलरचे (US$ 2,50,000) बक्षिस मिळणार आहे. हा पुरस्कार जगभरातील शाळांच्या समाजाच्या प्रगतीमध्ये शाळांचे योगदान पाहून देण्यात येतो.
सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार 5 श्रेणींमध्ये...
जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारासाठी विविध श्रेणींमध्ये टॉप 10 च्या यादीत निवडण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील तीन शाळांचा समावेश आहे. जगातील सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार 5 श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. यात समुदाय सहयोग, पर्यावरण कृती, नवीन उपक्रम, प्रतिकूलतेवर मात करणे आणि निरोगी जीवनास समर्थन देणे यांचा समावेश आहे. या पुरस्काराच्या सहाय्याने समाजाच्या पुढील पिढीच्या विकासात महत्त्वाच्या भूमिकेसाठी शाळांना प्रोत्साहन दिले जाते.
या भारतीय शाळांचा समावेश
पुरस्कार मिळालेल्या शाळांमध्ये दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रातील शाळांचा समावेश आहे. यात मुंबईतील दोन आणि अहमदनगर जिल्ह्यातील एका शाळेचा समावेश आहे. दिल्लीतील सरकारी स्कूल नगर निगम प्रतिभा बालिका विद्यालय (NPBV) F-Block दिलशाद कॉलनी तसेच या वर्गात मुंबईतील ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलचा देखील समावेश आहे. ही खासगी आंतरराष्ट्रीय शाळा आहे. गुजरातमधील रिव्हरसाइड स्कूल, अहमदाबाद ही देखील एक खासगी आंतरराष्ट्रीय शाळा आहे. तर ' स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, महाराष्ट्र ' ही अहमदनगरमधील एक धर्मादाय शाळा आहे. इथे HIV/AIDS ग्रस्त मुलांचे आणि सेक्स वर्कर कुटुंबातील मुलांना शिक्षण देऊन त्यांचे जीवन बदलण्याचे मोठे काम केले जात आहे. पाचवी शाळा मुंबईतील आहे. दादरमधील शिंदेवाडी मुंबई पब्लिक स्कूल. (द आकांक्षा फाउंडेशन), ही शाळा मुंबईतील एक चार्टर स्कूल आहे.