Shocking News : नामांकित कंपनीच्या ताकाच्या पाकिटात आढळले किडे; शिर्डी पदयात्रेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड
Shocking News : विशेष म्हणजे या पाकिटांवरील एक्स्पायरी डेट संपलेली होती. यावर ऑगस्ट महिन्यापर्यांतची एक्स्पायरी डेट होती. याचा अर्थ एक्स्पायरी डेट संपलेले ताक वापरात होते. त्यामुळे संबंधीत कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, उल्हासनगर : सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. यामुळे थंड पेयांची मागणी वाढली आहे. मात्र, उन्हाळ्यात थंडगार ताक पिताय तर सावधान. कारण उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) एका नामांकित कंपनीच्या पाकिटबंद ताकामध्ये किडे आढळून (Worms found in buttermilk) आले आहेत. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे (Shocking News).
शिर्डी पदयात्रेदरम्यान साई भक्तांना मध्यवर्ती हॉस्पिटल तसंच रिक्षा युनियनकडून ही ताकाची पाकिटं वाटण्यात आली होती. यातील काही पाकीटं खराब असल्याचा संशय आल्यानंतर साईभक्तांनी ती फोडून बघीतली असता त्यात किडे आढळून आल्याने त्यांना धक्का बसला.
विशेष म्हणजे या पाकिटांवरील एक्स्पायरी डेट संपलेली होती. यावर ऑगस्ट महिन्यापर्यांतची एक्स्पायरी डेट होती. याचा अर्थ एक्स्पायरी डेट संपलेले ताक वापरात होते. त्यामुळे संबंधीत कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
किटकॅट चॉकलेटमध्ये अळ्या सापडल्या
नांदेडमध्ये देखील असाच धक्कादायक प्रकार समोर घडला होता. नेस्टलेच्या किटकॅट चॉकलेटमध्ये अळ्या सापडल्या होत्या. सुभाष भंडारे नावाच्या व्य्कतीने लातूर फाटा इथल्या डी मार्ट मधून हे चॉकलेट खरेदी केले होते. या चॉकलेटमध्ये त्यांना अळ्या आढळल्या. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने चॉकलेटचा हा साठा जप्त करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला होता. त्यामुळे मुलांना चॉकलेट देण्यापूर्वी ते तपासून घेणं गरजेचं आहे.
एक्स्पायरी डेट न विसरता तपासून घ्या
पाकिटबंद पदार्थ तसेच वस्तूंवर त्यांची निमिर्ती दिनांक तसेच एक्स्पायरी डेट नमूद केलेली आहे. एक्स्पायरी डेट याचा अर्थ संबधीत वस्तू अथवा पदार्थ कोणत्या कालावधीपर्यंत वापरण्यास योग्य आहे. यामुळे एक्स्पायरी डेट संपलेल्या वस्तू खराब झालेल्या असतात. यामुळे एक्स्पायरी डेट संपलेले पदार्थ तसेच वस्तू हानीकारक ठरू शकतात. यामुळे वस्तू अथवा पदार्थ खरेदी करताना पाकिटावरील एक्स्पायरी डेट तपासून घ्या.