अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करणे राणा दाम्पत्याला चांगलेच भोवले आहे. या कारणावरून त्यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपन वलगावमधील १४७ पूरग्रस्त कुटूंबाला अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते घराचे पट्टे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी आपण नौटंकी करत नाही, त्यामुळे जेलमध्ये जाव लागत नाही, असा टोला अप्रत्यक्षपणे राणा दाम्पत्याला लगावला.


मी कठोर बोलतो, सरळ बोलतो, स्पष्ट बोलतो, मला नाटक जमत नाही मला काम जमते असे काही जण बाता मारत होते. पण हे नाटक करणारेच जेलमध्ये गेले. काही लोक तर तमाशाच करते. पण, आपल्याला आपल्या जिल्ह्याचा अभिमान असला पाहिजे अश्या शब्दात मंत्री यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर बोचरी टीका केली.