यवतमाळ : यवतमाळच्या आर्णी शहरातील आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीला चॉकलेट मधून गुंगीचे औषध देऊन बलात्कार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ जनक्षोभ उसळला असून आज दुसऱ्या दिवशी बोरगाव येथे संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर टायर पेटवून तासभर चक्काजाम आंदोलन केलं.


नागरिकांचा संताप 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 तर गुरुवारी रात्री तरुणी व महिलांनी आर्णी पोलीस स्टेशन वर भव्य मोर्चा काढून संताप व्यक्त केला. जवळा गावातही आज घटनेचा निषेध नोंदवित कडकडीत बंद पाळण्यात आला.


दरम्यान तणावाची स्थिती बघता वरिष्ठ पोलीस अधिकारी आर्णीत दाखल झाले असून शहरात पोलीस तैनात करण्यात आले आहे.


आरोपींची संख्या वाढली


 अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना अटक केली होती.


त्यानंतर आणखी ४ आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींची संख्या ६ वर पोहोचली आहे.