यवतमाळमधील कीटकनाशक मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी
घातक बियाणं उत्पादन प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे केली आहे.
यवतमाळ : घातक बियाणं उत्पादन प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातल्या कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन काही शेतक-यांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर केंद्रीय कापूस संशोधन संस्थेनं सखोल अभ्यास करुन, आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला.
या अहवालानुसार 5 नामांकित कंपन्यांच्या बीटी कॉटन बियाण्यांमध्ये 'हर्बिसाईड टॉलरन्ट जीन्स' आढळून आले आहेत. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 च्या तरतुदींचं त्यामुळे उल्लंघन होत आहे. म्हणून या पाचही कंपन्यांविरूद्ध नागपूरमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे अनेक राज्यांमध्ये अशाप्रकारच्या बियाण्यांचं उत्पादन होत आहे. यासाठीच या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे केली आहे.