यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याच्या वाणी नगर निगममध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. नराधमाने युवतीवर बलात्कार तर केलाच पण वर पाच लाखाची मागणीही केल्याची घटना घडलीयं. तीन वर्षे सतत बलात्कार आणि जबरदस्ती रक्कम बळकावण्याच्या आरोपाखाली आरोपीला अटक करण्यात आली आहे. २० वर्षीय युवतीच्या तक्रारीवरून आरोपी धीरज दिगंबर पाठे (२९ वर्षे) याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पाठे हा जिल्ह्यातील वाणी शहरात वासेकर लेआऊट येथे राहतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिडितादेखील त्याच विभागात राहत असून ती आरोपीला लहानपणापासून ओळखत असल्याचे तिने म्हटल्याचे वाणी पोलीस ठाण्याताल इन्स्पेक्टर बाळासाहेब खांडे यांनी सांगितले.


लग्नाच आश्वासन 


धीरजने मला लग्नाचं आश्वासन दिलं होतं, माझ्या लहान वयापासूनच त्याने माझं शोषण केलं. पण मी जेव्हा मोठी झाली असताना तो लग्न करण्यास नकार देतोय अशी तक्रार तिने दिली आहे. धीरज तिला त्रास देऊ लागला एवढच नव्हे तर ५ लाख रुपयांची मागणीही करू लागला. मला बदनाम करण्यासाठी त्याने माझ्यानावे फेक फेसबुक अकाऊंट बनवले आणि त्यातून आपत्तीजनक मेसेज पाठवल्याचेही तिने म्हटलंय.