COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे​: रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये नेहमीच आपण अनेक कारणावरून वाद पाहिलाय. त्यात भाडे नाकारणे हा विषय महत्वाचा. असे वाद होऊ नये यासाठी आत ठाण्यात 'हो रिक्षा' येऊ घेतली आहे. ठाणे वैभव व आपण भंडार या दोघांनी ही अभिनव संकल्पन राबवली आहे. या मध्ये रिक्षांवर हो रिक्षा असे स्टिकर लावण्यात येणार आहेत, या रिक्षा कधीच भाडे नाकारणार नाही तर अशा रिक्षाधारकांची सोडत काढण्यात येणार आहे आणि रोज ५  ऱिक्षधारकांना  १५० रुपयाचा किराणा माल कुपन देण्यात येणार आहे. या संकल्पनेचे ठाणेकरांनी ही स्वागत केले आहे.


ठाणे वैभव पेपर्स आणि आपना भंडारचा पुढाकार


ठाण्यात जवळपास ३० लाख प्रवाशी रिक्षांनी प्रवास करतात. जवळपास ठाण्यात ३० ते ३५ हजार रिक्षा आहेत. परंतु असे असताना रिक्षाचालक व प्रवाशांमध्ये दुरावा आहे त्यात अनेक कारणावरून नेहमीच भांडण होतात. त्यात प्रामुख्याने जवळचे भाडे नाकारणे, किंवा भाडेच नाकारणे अशा गोष्टींवरून भांडण हमखास होते आणि याचा मनस्ताप चाकरमानी, गरोदर महिला व वयोवृद्ध प्रवाशांना होतो. आता हा वाद मिटवावा आणि काही राक्षचालकांची ही सवय मोडावी यासाठी आता ठाणे वैभव पेपर्स आणि आपना भंडार यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी हो रिक्षा ही अभिनव संकल्पना पुढे आणली आहे.


रिक्षाचालक यामधील भांडण कायमचे मिटणार?


हो रिक्षा संकल्पनेमध्ये ज्या रिक्षांवर हो रिक्षा असे स्टिकर लावण्यात येणार आहे. त्या रिक्षा कोणताही भाडं नाकारणार नाही त्याच. अशा रिक्षाधारकांची सोडत काढण्यात येणार आहे आणि रोज ५  ऱिक्षधारकांना  १५० रुपयाचा किराणा माल कुपन देण्यात येणार आहे. तर याही पुढे वर्षाला बंपर बक्षीस ही असणार आहे. अशी वेगळी संकल्पना ही आहे. यामध्ये प्रवाशांचा ही फायदा होणार आहे तर रिक्षाचालक यांचाही फायदा होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रवाशी व रिक्षाचालक यामधील भांडण कायमचे मिटणार असून हा रिक्षा प्रवेश सुखकारक होणार आहे ... असे आयोजक सांगत आहेत.