भिवंडी : निजामपूर शहर महापालिका निवडणुकीत भिवंडीचे योगी म्हणून प्रसिद्ध झालेले अंबादास सिंघम यांचा ९१ मतांनी पराभव झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भिवंडी महापालिकेच्या प्रभाग क्र. २२ (ब) मधून भाजपच्या वतीने अंबादास सिंघम हे निवडणुकीच्या मैदानात होते. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे महापौर तुषार चौधरी यांना भिवंडीच्या या ‘योगी’ ने कडवे आव्हान दिले होते. अंबादास सिंघम हे प्रभागात प्रचारादरम्यान मुख्यमंत्री योगींची हुबेहूब छबी दाखवून मतदारांना मत मागत होते. उत्तर भारतीय मतदारही त्यांना पाहून बुचकाळ्यात पडताना दिसत होते.


या प्रभागात “कांटे की टक्कर” पाहावयला मिळाली. शिवसेनेचे महापौर तुषार चौधरी विजयी होऊन हि नाराज होते. चौधरी यांच्या पॅनल मधून फक्त ते एकटेच निवडून आलेत तेही फक्त 91 मतांनी.