ईडीच्या चौकशीला आपण तयार : अजित पवार
ईडीमार्फत होणाऱ्या चौकशीला आपण कधीही तयार असून, ही चौकशी मात्र निष्पक्ष झाली पाहिजे असं आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
सातारा : ईडीमार्फत होणाऱ्या चौकशीला आपण कधीही तयार असून, ही चौकशी मात्र निष्पक्ष झाली पाहिजे असं आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
आतापर्यंत झालेल्या चौकशीला आपण योग्य ते सहकार्य केलं असून, सर्व प्रश्नांची उत्तरंही दिली असल्याचं अजित पवार म्हणाले. साताऱ्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दरम्यान सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेऊन, भाजप सरकारनं लोकशाहीला हरताळ फासला असल्याची टीकाही अजित पवार यांनी यावेळी केली.