`त्या` निर्णयामुळे 5 जणांना पुन्हा मिळाली जगण्याची संधी...
त्यांनी हा निर्णय घेऊन समाजासमोर अवयवदानाचा आदर्श ठेवला.
Trending News : अवयवदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. अवयवदानामुळे गरजू रुग्णांना पुन्हा जगण्याची संधी मिळते. गेल्या काही वर्षात अवयवदानाचे महत्त्व अनेकांना कळलं आहे. अवयवदानामुळे आजपर्यंत अनेकांना जीवनदान मिळाले आहे.
समाजासमोर अवयवदानाचा आदर्श
पुण्यातील एका मुलीमुळे 5 जणांना नवीन आयुष्य मिळालं आहे. अपघातात जखमी झालेली मुलगी आयुष्यातील शेवटचे क्षण मोजत असताना रुग्णालयात आणण्यात आली. तिचं ब्रेन डेड झालं असं, डॉक्टरांनी सांगताच कुटुंबावर दु:खाचं डोंगर कोसळलं. खरंतर हे ऐकल्यानंतर काय करावं? असा प्रश्न कुटुंबासमोर उभा राहिला. पण या धक्काने खेचून न जाता त्यांनी समाजाचा विचार केला. येवढ्या मोठ्या धक्कातही या कुटुंबाने मुलीचे अवयवदान करण्याचं ठरवलं. त्यांनी हा निर्णय घेऊन समाजासमोर अवयवदानाचा आदर्श ठेवला.
5 जणांना दिलं एक नवीन आयुष्य
मृत्यूनंतर अवयवदान संकल्पनाची जाणीव या कुटुंबियांना असल्याने ही किमया घडली. भारतीय सेनेतील दोन जवानांना तिची किडनी देण्यात आली. तर या तरुणीचे डोळे सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय संकुलाच्या नेत्रपेढीमध्ये ठेवण्यात आले आहे. तसंच तिचे यकृत गरजू व्यक्तीला देण्यात आले.
खरंतर दु:खाचं डोंगर कोसळलं असताना असा धाडसी निर्णय घेणे कुठल्याही कुटुंबासाठी अवघड असतं. पण या कुटुंबाने घेतल्या निर्णयामुळे 5 जणांना हे सुंदर आयुष्य परत जगता येणार आहे.