Lonavala Tiger Point  :  टायगर पॉईंट हे लोणावळ्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हजारो पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात.  टायगर पॉईंट जवळ एक दुर्दैवी घटना घडली आहे. लोणावळ्यातील टायगर पॉईंटवरून पडून एका इंजिनीयर तरुणीचा मृत्यू झाला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साक्षी रमेश होरे असं मृत तरुणीचे नाव आहे. ती पिंपरी-चिंचवडच्या डॉ. डीवाय पाटील कॉलेज येथे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती.  लोणावळ्यातील टायगर पॉईंट येथे ती फिरायला आली होती. त्यावेळी तिचा पाय घसरून अपघात झाल्याचं प्राथमिक पोलीस तपासात समोर आलं आहे.


घटनास्थळी लोणावळा शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांची टीम दाखल झाली. रेस्क्यू टीमने जखमी साक्षीला टायगर पॉईंटच्या दरीतून बाहेर काढले, मात्र उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला असल्याचं खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैधकीय अधिकारी यांनी घोषित केले. टायगर पॉईंट जितंक सुंदर आहे तितकच ते धोकादायक देखील आहे.  टायगर पॉईंटवर तारेचं कुंपण तयार करण्यात आलं आहे. टायगर पाईंटच्या एका बाजूला खोल दरी आहे.