कळंबोली : १२ व्या मजल्यावरून कोसळून कळंबोलीत तरूणीचा मृत्यू झालाय. खारघरच्या सेक्टर ३५ मध्ये ही घटना घडलीय. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. गुरूशरणजीत कौर असं मुलीचं नाव आहे. ही मुलगी नातेवाईकांकडे राहायला आली होती. ही मुलगी १२ व्या मजल्यावरून खाली पडली कशी याचा शोध सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. तरुणीचे नातेवाईक आणि शेजारी यांच्याकडे माहिती विचारली जात आहे. या घटनेचा कोणी प्रत्यक्षदर्शी आहे का ? हे पाहिले जात आहे. हा अपघात होता की घातपात होता ? याचा तपास केला जात आहे.