ठाणे :  शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एक माथेफिरु लहान मुलांना काहीतरी घेऊन टोचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये ठाण्यातल्या सरस्वती शाळेबाहेर हा माथेफिरु फिरत असल्याचे दिसत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या लहान मुलांच्या मागे धावत तो त्यांना काहीतरी टोचत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.  त्याने दोन ते तीन लहान मुलांना टोचल्याचे सीसीटीव्हीत कैद झालेय. या माथेफिरुला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा माथेफिरु सुरुवातीला लहान मुलांना पीन टोचत असेल वाटत होते, मात्र पोलिसांनी त्याच्याकडून पेन जप्त केलाय. ६ ऑगस्टचा व्हिडिओ आहे. अभिषेक मोरे असे त्याचे नाव असून तो मनोरुग्ण असल्याची माहिती मिळत आहे.