एकतर्फी प्रेमातून आजी-नातवाची हत्या करणाऱ्याची आत्महत्या
एकतर्फी प्रेमातून आजी-नातवाची हत्या (Grandmother and Grandson Murder) करणाऱ्या आरोपीने आत्महत्या (commits suicide) केली आहे.
नागपूर : एकतर्फी प्रेमातून आजी-नातवाची हत्या (Grandmother and Grandson Murder) करणाऱ्या आरोपीने आत्महत्या (commits suicide) केली आहे. मानकापूर रेल्वे क्रॉसिंगजवळ रेल्वेसमोर त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. एकतर्फी प्रेमाला विरोध केल्याने मुलीची आजी आणि तिच्या भावाची आत्महत्या करणाऱ्याने काल हत्या केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
नागपूरच्या हजारीपहाड भागात कृष्णानगरमध्ये राहणाऱ्या ६० वर्षांच्या लक्ष्मीबाई धुर्वे आणि त्यांचा १० वर्षांचा नातू यश धुर्वे अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. आरोपी भेटण्यासाठी तरुणीवर दबाव आणायचा. १५ दिवसांपूर्वी त्याने तरुणीला जबर मारहाण केली होती. त्यात तिच्या एका डोळाला जबर दुखापत झाली होती. त्यावेळी धुर्वे कुटुंबातील काही कौटुंबिक मित्रांनी पोलिसांकडे तक्रार देण्याचा सल्ला दिला होता. मात्र, ती तरुणी मारहाणीनंतर एवढी जास्त घाबरलेली होती की तिची अवस्था पाहून कुटुंबीयांनी तक्रार देण्यास धजावले नाहीत.
तसेच हा तरुण सतत धुर्वे कुटुंब राहत असलेल्या भागात यायचा, मारहाणीत डोळ्याला जबर दुखापत झाल्यानंतर परिसरात तिची ती अवस्था पाहून बदनामी होईल म्हणून धुर्वे कुटुंबियांनी आपल्या मुलीला नातेवाईकांकडे पाठवले. त्यानंतर आरोपी तरुण आणखी चिडला आणि त्याने काल टोकाचा पाऊल उचलत घरी येऊन तरुणीबद्दल विचारणा केली, तरुणीची आजी लक्ष्मीबाईंना जाब विचारण्यास सुरुवात केली. समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आधी लक्ष्मीबाई यांची आणि नंतर १० वर्षीय नावतवाची हत्या केली. त्यानंतर त्याने रात्री स्वतः रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.