नागपूर : पॉर्न क्लिप पाहून सेक्स करणे एका प्रमीयुगलासाठी जीवघेणे ठरल्याची घटना नागपुरात घडली आहे. यामध्ये 28 वर्षीय तरुणाचा गळफास लागून लागून मृत्यू झाला आहे. खापरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक लॉजच्या रुमवर प्रेमीयुगल पॉर्न क्लिप बघून वेगळ्या पद्धतीने शारीरिक संबंध प्रस्थापित करत असताना ही घटना घडली. मयत तरुण विवाहित असून त्याला लहान मुलगा आहे. तरही तो त्या तरुणीसोबत रिलेशनमध्ये होता. मृतक तरुण आणि 20 वर्षीय तरुणीमध्ये गेल्या काही वर्षांपासून प्रेम संबंध आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल दोघांनीही बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला. त्यांनी  खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) परिसरात असलेल्या महाराजा लॉज वरील एक खोली बुक केली होती. तिथे गेल्यानंतर दोघांनी शारीरिक संबंध प्रस्तावित केले. यावेळी वेगवेगळ्या पोजिशनमध्ये शारीरिक संबंध प्रस्तावित करताना दोघांनी दोरीचा उपयोग केला. तरुण खुर्चीवर बसल्यानंतर त्याचे हात आणि पाय दोरीने बांधण्यात आले. त्याच वेळी ती दोरी तरुणाच्या गळ्याच्या भवती सुद्धा अवळली गेली. या पोजिशनमध्ये सेक्स झाल्यानंतर ती तरुणी बाथरूम मध्ये गेली असता. तो तरुण खुर्ची सहखाली कोसळला, ज्यामुळे त्याच्या गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला होता, ज्यामुळे त्याला गळफास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 


ज्यावेळी ती तरुणी बाथरूमच्या बाहेर आली,तो पर्यंत त्या तरुणाचा मृत्यू झाला होता. दरम्यान हे सर्व करताना त्यांनी स्वत:चे फोटोही काढले असल्याचं तपासात समोर आलं आहे.