लातूरमध्ये वाहत्या पाण्यातून एकजण गेला वाहून
पाण्याचा प्रवाह मोठा असल्यानं पाण्यासोबत हा माणूस वाहून गेला
लातूर : लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या नागेवाडी पुलावरचा हा थरारक प्रसंग... शनिवारी दुपारपासूनच शिरूर अनंतपाळ तालुक्यात जोरदार पाऊस पडत असून, त्यामुळं घरणी नदीला महापूर आलाय... नागेवाडी पुलावरून घरणी नदीचं पाणी वाहत होते... या वाहत्या पाण्यातून पूल पार करण्याचा प्रयत्न एकानं केला... मात्र हा प्रयत्न त्याच्या चांगलाच अंगलट आला. पाण्याचा प्रवाह मोठा असल्यानं पाण्यासोबत हा माणूस वाहून गेला... हा सगळा थरारक प्रसंग घडला तेव्हा पुलाच्या दुतर्फा लोक उभे होते. मात्र पाण्यात वाहून गेलेल्या या व्यक्तीला ते वाचवू शकले नाहीत.