Jalana Crime News :  पाठील खंजीर खुपसल्याचे आपण नेहमीच ऐकतो. मात्र, हाच खंजीर पाठीत नाही तर पोटात खुपसला आहे. जालना येथे ही धक्कादादायक घटना घडली आहे. किरकोळ वादातून थेट खंजीर काढून हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. 


नेमकं काय घडल?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाशिंग सेंटरवर कार धुण्याच्या वादातून एकाच्या पोटात खंजीर खुपसून त्याला गंभीर जखमी केले आहे. मंगळवारी दुपारी जालना शहरात ही घटना घडली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परीसरात प्रकार घडला आहे. शेख अलीम शेख जमील असं गंभीर जखमी असलेल्या तरुणाचं नाव आहे. सोमवारी शेख अलीम याचा कार धुण्याच्या कारणावरून एकाशी वाद झाला होता.या वादातून आज शेख अलीम याच्या पोटात धारदार खंजीर खुपसण्यात आला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी शहरातील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे.पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून आरोपींचा शोध सुरु केला आहे.


भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्षावर भर दिवसा गोळ्या झाडल्या


हिंगोलीत भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर भर दिवसा गोळ्या झाडण्यात आल्या. यातील 2 गोळ्या पप्पू चव्हाण यांच्या पाठीत लागल्याची माहिती आहे, हिंगोली जिल्हा परिषदेबाहेर ही घटना घडली. त्यांच्यावर 2 हल्लेखोरांनी थेट गोळीबार करत, 3 गोळ्या झाडल्या. यात चव्हाण जखमी झाले असून त्यांना एका खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलय. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लोखोरांचा तपास सुरू केलाय. पोलीसांना संशयित आरोपीची ओळख पटली असून तीन पथके त्यांच्या मागावर असल्याची माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली आहेत.


वाशिम येथे सामाजिक कार्यकर्ते सलीम तेली यांच्यावर प्राणघातक हल्ला


वाशिम च्या कारंजा शहरातील सामाजिक कार्यकर्ते सलीम तेली यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली असून यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सलीम तेली यांच्यावर कारंजा शहरातील झांशी राणी चौकातील एका हॉटेल समोर 3 ते चार जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये सलीम तेली हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर अकोला इथं उपचार सुरू आहेत.या हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून कारंजा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित दादा गटाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजानी आणि तत्कालीन मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. सलीम तेली यांच्यावरील हल्ला प्रकरणी 4 जणांवर कारंजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्यासाठी युसूफ पुंजानी आणि दादाराव डोल्हारकर यांची नावे जखमी सलीम तेली यांनी घेतली असून कारंजा शहर पोलीस पुढील तपास करत असल्याचे कारंजा ठाणेदार दिनेश्चंद्र शुक्ला यांनी सांगितले.