कोल्हापूर : जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील माद्याळ गावात एक थरारक अपघात पहायला मिळाला.  बैलगाडी आणि घोडागाडी शर्यत स्पर्धा रंगत असताना हा अपघात झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शर्यतीत एका घोडा गाडीच्या मालकाने शर्यत जिंकली मात्र आनंदाच्या भरात नेहमीप्रमाणे शडू मारण्याचा प्रयत्न केला; त्यावेळी त्याचा तोल जावून तो खाली कोसळला. एका मागुन एक मागून येणाऱ्या गाड्या आणि  घोडा गाड्या त्याच्या अंगावरुन गेल्या. दैव बलवत्तर म्हणून घोडा गाडी चालकांचा जीव वाचला.


शर्यत पहाण्यासाठी आलेल्या तरुणांनी त्याला तात्काळ बाजुला करुन पाणी पाजलं आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. हा सगळा प्रकार एका तरुणांने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.