पुणे :  कात्रज परिसरातील जांभुळवाडीत असलेल्या एका जलतरण तलावात बुडून सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सोमेश राठोड (वय १६) असं मृत मुलाचं नाव असून कात्रजमधल्या सच्चसाईमाता मंदिरजवळ रहाणाराहोता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जांभुळवाडी भागात अर्जुन जलतरण तलाव आहे. सोमेश राठोड सोमवारी दुपारी जलतरण तलावात पोहण्यास गेला होता. पोहत असताना मध्येच त्याला दम लागला आणि तो बुडाला. जलतरण तलावात पोहणाऱ्या एका मुलाच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने तात्काळ तलावाच्या व्यवस्थापनाला याची माहिती दिली.


त्यानंतर काही जणांना सोमेशला बाहेर काढलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नाका तोंडात पाणी गेल्याने सोमेशचा मृत्यू झाला होता. 


जलतरण तलावाच्या ठिकाणी जीवरक्षक असणं बंधनकारक असतानाही या जलतरण तलावाच्या ठिकाणी जीवरक्षक नेमण्यात आले नव्हते. याबाबतची तक्रार रहिवाशांनी महापालिकेकडे काही दिवसांपूर्वी केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. 


जलतरण तलाव व्यवस्थापनाच्या बेजबाबदारीमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.