Parliament Security Breach : संसदेची सुरक्षा भेदत दोन अज्ञात व्यक्तींनी आज लोकसभेत प्रवेश केला आणि देशात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर महाराष्ट्राची सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली. महाराष्ट्र ATS ने एका तरुणाला ताब्यात घेतले. हा तरुण मुंबईला लागून असलेल्या ठाणे शहरातील आहे. या तरुणाच्या चौकशीत अत्यंत धक्कादायक माहिती ATS च्या हाती लागली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौरव पाटील असे एटीएसने अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. ठाण्यात राहणारा गौरव याने पाकिस्तान बेस्ड इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह ला भारतीय प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवल्याचे पुरावे एटीएस च्या हाती लागले आहेत. मे ते ऑक्टोबर 2023 पर्यंत फेसबुक आणि व्हाट्सअप द्वारे माहिती पुरवल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे. 


गौरव पाटील याने ऑनलाईन पैसे मिळवल्याचे पुरावे देखील  प्राप्त झाले आहेत. तर, गौरव पाटील याच्यासह त्याच्या संपर्कातील आणखी तीन व्यक्तींना देखील एटीएसने ताब्यात घेतले आहे.  पुढील चौकशी एटीएस करत आहे. 
ATS ची मोठी कारवाई


दहशतवाद विरोधी पथकाला गौरव पाटील याची संशयीत म्हणून चौकशी केली. चौकशी दरम्यान  एप्रिल ते मे 2023 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत फेसबुक व वॉट्सअॅपद्वारे दोन PIO शी ओळख झाली होती. गौरवेने नमूद PIO शी फेसबुक व वॉटसअॅपवर चॅटींग करुन त्यांना भारत सरकारने प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रातील गोपनिय माहिती वेळोवेळी पुरविली असल्याचे तसेच नमूद PIO कडून ऑनलाईन पैसे स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न  झाले आहे.


सदर प्रकरणी संशयीत इसम व त्याच्या संपर्कातील इतर 3 व्यक्ती अशा एकूण 4 इसमांविरुध्द दहशतवाद विरोधी पथक पो. ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात संशयीत इसमास अटक करण्यात आली असुन दहशतवाद विरोधी पथकाकडून पुढील तपास करण्यात येत आहे.


संसद घुसखोरी प्रकरणात 6 जणांचा समावेश


संसद घुसखोरी प्रकरणात 6 जणांचा समावेश असल्याचं समोर आलंय. यातील 4 जणांना अटक करण्यात आलीय तर 2 जण फरार आहे. त्यांचा तपास यंत्रणांकडून शोध घेतला जातोय. विशेष म्हणजे यातील एक आरोपी मनोरंजन हा गेल्या 6 महिन्यांपासून संसदभवन परिसरात पासेस मिळवण्यासाठी फे-या मारत होता. आता या सगळ्या आरोपींचा घुसखोरीमागचा नेमका उद्देश काय होता, याचा शोध पोलीस घेतायेत. अटक करण्यात आलेले चारही आरोपी गुरूग्रामच्या सेक्टर 7 मधील हाऊसिंग बोर्डात थांबले होते. या प्रकरणात हिस्सारमधील विक्की शर्मा आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आलीय. चौघेही विक्का शर्माच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येतीय.