सातारा : लग्न हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर जीवन बदलते असं म्हणतात. मात्र हेच लग्न एका युवकासाठी घातकं ठरलंय. लग्न ठरत असल्याने नैराश्य आलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडलीये. नितीन शेंडगे असं या तरुणाचं नाव आहे. साताऱा जिल्ह्यातील बदेवाडी गावात ही घटना घडलीये. नितीनसाठी घरचे अनेक स्थळ बघत होते. मात्र नैअनेक ठिकाणी नोकरीमुळे त्याला सतत अपयश येत होते. 


आपल्या मित्रांची लग्ने झाली मात्र आपले होत नाहीये यामुळे नितीनला नैराश्य आले होते. आत्महत्येच्या आदल्याच दिवशी रात्री त्यांच्या घरात याबाबत चर्चा झाली. मात्र काही वेळाने त्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. नितीनने हे पाऊल उचलल्याने त्याच्या कुटुंबियांना जबर धक्का बसलाय. तसेच संपूर्ण गावावर शोककळा पसरलीये.