प्रताप सरनाईक / कोल्हापूर : आता एक धक्कादायक बातमी. जिल्ह्यातील गवशीपैकी पाटीलवाडी येथे स्पर्धेच्या नावाखाली तरुणांनी धिंगाणा घातला. पाटीलवाडी गावातील काही तरुणांनी विनापरवाना क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करुन चक्क शिवारात 'चिअर्स गर्ल्स' (Cheer girls in cricket tournament Kolhapur) आणून धिंगाणा घातल्याचे उघड झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट सामन्याला (cricket tournament) 'चिअर्स गर्ल्स' (Cheer girls ) येणार म्हणून काम धंदा सोडून हजारो तरुण शिवारात 'चिअर्स गर्ल्स'ला पाहायला आले होते. यावेळी 'चिअर्स गर्ल्स'नी गाण्यावर ठेका धारताच उपस्थित असणाऱ्या तरुणांनी 'चिअर्स गर्ल्स'चे हात पकडून नाचायला सुरुवात केली. असा प्रकार तीन ते चार तास सुरू होता. महत्वाचे म्हणजे एका वडिलांनी मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या क्रिकेट स्पर्धा भरवल्या होत्या.



हा सर्व प्रकार पोलिसांना कळताच शिवारात असणारे संयोजक, तरुण आणि 'चिअर्स गर्ल्स' यांनी धूम ठोकली. त्यांनतर राधानगरी पोलिसांनी कोरोना मार्गदर्शन सूचनांचे उल्लंघन केल्याने संयोजकांसह 'चिअर्स गर्ल्स' आणि त्यांच्यासोबत नृत्य करणाऱ्या तरुणांवर राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.