वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव  : राज्यातील सत्तानाट्यापासून (Maharashtra Political Crisis) शिवसेनेला लागलेली गळती एकनाथ शिंदे गटातील (Eknath Shinde Group) इनकमिंग अजूनही सुरुच आहे. आमदारांपासून झालेली सुरुवात ही आता थेट युवासेनापर्यंत (Yuva Sena) येऊन पोहचली आहे. उत्तर महाराष्ट्रातील युवासेनेच्या 80 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत 'जय महाराष्ट्र' केला आहे. या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. (yuva sena 80 officials resign his post and support to chief minister eknath shinde group at jalgaon in presens of gulabrao patil)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवा सेनेच्या 80 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. यावेळी जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. शिवसेनेने निष्ठावंतांना डावलून आयारामांना पदं देण्याचा सपाटा  सुरू केला आहे. त्यामुळे आम्ही सर्व राजीनामा देत आहोत, असं युवा सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. 


गुलाबराव पाटील यांची टोलेबाजी


यावेळी गुलाबराव पाटील हे पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यावर टीका केली.


शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या शाखामध्ये जावं लागत आहे. यासारखं दुसरे दुर्दैव नाही. उद्धव आणि आदित्य यांनी आधीच हे दौरे केले असते, तर कदाचित ही वेळ आली नसती, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला. 


तसेच उद्धव ठाकरे हे आजारी होते मात्र आदित्य हे तर तरुण होते. आता संपूर्ण राज्यात शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून युवासेना प्रमुख दौरे करत आहेत. आदित्य यांनी आधीच सर्व जिल्ह्यांचे दौरे केले असते, तर कदाचित आज ही वेळ आली नसती, अशी टीकाही पाटील यांनी यावेळेस केली.