`उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची छुपी युती`, नेत्याचा खळबळजनक दावा, म्हणाले `येत्या काळात मोदींचं...`

आमदार रवी राणा यांनी मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपासोबत येतील असा दावा त्यांनी केला आहे.
आमदार रवी राणा यांनी मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपासोबत येतील असा दावा त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची छुपी युती असल्याचा दावा रवी राणांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. राणांच्या या दाव्यात कितपत तथ्य आहे. पाहुयात या रिपोर्टमधून...
'उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीसांची छुपी युती'
'ठाकरे येत्या काळात फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारणार'
आमदार रवी राणांचा खळबळजनक दावा
युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी आपल्या एका दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत छुपी युती आहे. आगामी काळात ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व स्विकारणार असल्याचं राणा म्हणाले आहेत .त्या दृष्टीने पाऊल टाकणे सुरु असल्याचा दावाही रवी राणा यांनी केला. तर या छुप्या रणनीतीची संजय राऊत यांना कल्पना नाही. ते आधी सुद्धा अंधारात होते आणि आता सुद्धा अंधारात आहेत, असे रवी राणा म्हणाले. राणांच्या या वक्तव्याचा अंबादास दानवे यांनी समाचार घेतलाय. उद्धव ठाकरे कुठलंही काम छुप्या पद्धतीने करत नाहीत जे करायचे ते उघडपणे करतात असा पलटवार दानवेंनी केला आहे.
2019 मध्ये युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मोठी दरी निर्माण झाली. अनेकदा दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर तुफान टीका केली. मात्र यंदाच्या निवडणुकीनंतर नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आमदार आदित्य ठाकरे यांनीही विविध विकास कामांच्या मुद्यांवरून फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. मुख्यमंत्र्यांचे जवळच्या असलेल्या रवी राणांच्या या नव्या दाव्याने पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.