झी 24 तास इम्पॅक्ट : मुलींचे वसतीगृह जेल प्रशासनानं केलं खाली, कैद्यांना दुसरीकडे नेणार
कैफियत झी24तास ने मांडल्यानंतर अखेर मुलींचे वस्तीगृह खाली करण्यात आलंय
विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : शाळा कॉलेज सुरू झाली मात्र मागील दोन महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील मुलींचे शासकीय वस्तीग्रह सुरू होत नव्हतं. ही बातमी झी 24तासने दाखवली आणि त्यानंतर प्रशासन जागं झालं. मागील दोन महिन्यापासून शाळा सुरू होऊन देखील वस्तीग्रह सुरू नसल्यामुळे विद्यार्थिनींची परवड होत होती. मात्र जेल प्रशासन वस्तीगृह खाली करत नव्हतं. ही कैफियत झी24तास ने मांडल्यानंतर अखेर मुलींचे वस्तीगृह खाली करण्यात आले आहे.
या ठिकाणी राहणारे सर्व कैदी आता दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहेत. त्यामुळे आता या मुलींचे वसतिगृह सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन महिन्यापासून बंद असलेले मुलींचे शासकीय वसतिगृह सुरू झाल्यामुळे विद्यार्थिनींनी झी24तास चे आभार मानले.
मागील दोन महिन्यापासून शाळा कॉलेज सुरू झाले मात्र वस्तीगृह सुरू झालं नाही. त्याठिकाणी कैद्यांना ठेवण्यात आलं होतं. आमचं वस्तीगृह सुरू न झाल्यामुळे आम्हाला बाहेर भाड्याने रूम करून राहावं लागत होतं. मात्र आता आमचं वस्तीग्रह रिकामा करण्यात आल्याचे विद्यार्थीनी सांगतात.
आम्हाला बोनाफाईट मागून प्रवेश करण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यानुसार आम्ही सर्व कागदपत्र जमा केलेली आहेत. झी24तासने ही बातमी दाखवल्यामुळे आज आम्हाला आमच्या वसतीगृहामध्ये पुन्हा राहण्याची सोय होणार आहे. यासाठी झी24तास चे आभार मानतो असं मत ज्योती बामणे या विद्यार्थीनीने व्यक्त केले.