ज्येष्ठ कीर्तनकार-प्रवचनकार बाबा महाराजांना `झी २४ तास अनन्य जीवनगौरव सन्मान`
मुंबईल्या वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा देखणा सोहळा पार पडला.
मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार-प्रवचनकार हभप बाबा महाराज सातारकर यांना 'झी २४ तास अनन्य जीवनगौरव सन्मान' प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देशन बाबा महाराजांना गौरवण्यात आलं. याबरोबरच डॉ. मिलिंद भोई, सी.बी. नाईक, बाबूराव पेठकर, रामसिंग वळवी, राजेश वांगड, आकाश खिल्लारे आणि ताई बामणे यांनाही विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल झी २४ तास अनन्य सन्मान देऊन गौरवण्यात आलं. मुंबईल्या वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा देखणा सोहळा पार पडला.
'समाजाला अध्यात्माशी जोडण्याचे काम बाबा महाराजांनी केले. समाजात विचारांचे रोपण करणे यापेक्षा मोठे काम नाही. त्यामुळे मी झीचे आभार मानेन. कारण जीवनगौरव पुरस्कार बाबा महाराजांना देऊन जीवन गौरव पुरस्काराचा गौरव वाढवण्याचे काम झी ने केल्याचे' कौतुकोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.