रामराजे शिंदे, झी मीडिया, मुंबई : काँग्रेसचे नेते विजय विडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पक्ष नेतृत्वाची भेट घेऊन ओबीसी चेहरा प्रदेशाध्यक्षपदी (OBC Face On State President) देण्याची मागणी केलीय. तर मंत्री असताना अथवा मंत्रीपद काढूनही प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्यास आपण तयार असल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी पक्ष नेतृत्वाकडे सांगितले आहे. मंत्रीपद सोडून प्रदेशाध्यक्षपद स्वीकारायला तयार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी वडेट्टीवारांनी दंड थोपटलेयत. 'झी 24 तास'ला दिलेल्या EXCLUSIVE मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसमध्ये दबावाच्या राजकारणाला वेग आलाय. पक्षात मराठा वि. ओबीसी राजकारण तापलंय. या पार्श्वभुमीवर मंत्रीपद ठेवून प्रदेशाध्यक्षपद दिले तर ठीक अन्यथा मंत्रीपद सोडायला तयार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. 



काँग्रेस पक्षानं प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर न्याय देईन. पक्षानं प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी चेहरा द्यावा. काँग्रेसकडे ओबीसी मतदार ३८ टक्के होता. आता १२ टक्के ओबीसी मतदार उरलाय. ओबीसी मतदारांना आकर्षित करावं लागणार असून संघटना बांधणीकडे लक्ष देण्याची इच्छा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.