Zika Virus Maharashtra | राज्याला झिकाचा धोका, केंद्रीय पथक पुण्यात दाखल
राज्यात झिका व्हायरसचा (Zika Virus) पहिला रूग्ण पुणे (Pune) जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात आढळला.
किरण ताजणे, झी मीडिया, पुणे : राज्यात झिका व्हायरसचा (Zika Virus) पहिला रूग्ण पुणे (Pune) जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात आढळला. पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे एका ५० वर्षीय महिलेला झिका संसर्ग झाला होता. मात्र या महिलेला सौम्य लक्षणं असल्यानं धोका नसल्याचं तज्ज्ञांनी म्हंटलय. हा विषाणू नवा असल्यानं त्याला गांभिर्यानं घेतलं जात आहे. त्यानंतर आता पुणे जिल्ह्यात केंद्राचं आरोग्य पथक दाखल झालं आहे. (Zika virus dangerous to Maharashtra Central govermment Squad arrives in Pune)
केंद्राचं हे पथक आज (4 ऑगस्ट) पुण्यात आरोग्य विभागाच्या विविध अधिकाऱ्यांशी बैठक करणार आहेत. बैठक झाल्यानंतर ते बेलसर गावाला भेट देणार आहे. केंद्राचं हे एकूण त्रिसदस्यीय अधिकाऱ्यांचं पथक आहे. एकूण 2 दिवस हे पथक आढावा घेणार आहेत.
झिका हा नवा विषाणू असल्याने त्याला गांभीर्याने घेतलं जातंय. झिका व्हायरस तपासणीसाठी बेलसर गावाच्या आसपासच्या 6 गावातल्या 18 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आसपासच्या गावात 15 पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. आत्तापर्यंत 3 हजार 210 संशयितांची तपासणी करण्यात आलीय.