औरंगाबाद : तुम्ही कुणाच्या इशाऱ्यावर चालता ? तुमचा गॉडफादर कोण आहे ?  तुम्हीच सांगा असा प्रश्न भाजप नेते रावसाहेब दानवेंनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय. औरंगाबादमध्ये झालेल्या भाजप मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी रावसाहेब दानवेंवर निशाणा साधला होता. त्याला दानवेंनी प्रत्युत्तर दिले. आमचा आमच्या कडे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहिले दाऊदचा बाप काढत होते, मग नवाज शरीफचे काढले आता हिंदुत्व गेलं म्हणून आता आमचे बाप यांना काढावे लागताय असे दानवे यावेळी म्हणाले. माझं कुटुंब माझी जबाबदारी चि खुप खिल्ली उडवली आहे. यावेळी दानवेंनी 'माझं कुटुंब माझी जबाबदारी' या संकल्पनेची खिल्ली उडवली. जो कुणी मदत मागायला जातो त्याला तुमचा प्रश्न तुमची जबाबदारी असं सरकार म्हणतं. काय म्हणावं ? असा प्रश्न दानवेंनी खास शैलीत उपस्थित केला. केंद्राकडे आमचे पैसे आहेत तर आम्ही म्हणतो तुमचं सरकार तुमची जबाबदारी असे देखील दानवे म्हणाले. 



देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी आम्ही पंचनामे न करता मदत केली आणि नशीब बदलले. हे मुखयमंत्री झाले. हे घराबाहेरच पडेना, काय करावे असे देखील दानवे पुढे म्हणाले. तिकडे ट्रम्प पडले पण मोदी जिंकले, बघा करिष्मा, त्यामुळं कामाला लागा, इकडे पण आपणच जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.