औरंगाबाद: औरंगाबादमध्ये एका नवरदेवाला पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. आपल्या हळदीत तलवार नाचवणाऱ्या नवरदेवाला पोलिसांनी कायद्याची भाषा शिकवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादच्या पुंडलिकनगरमध्ये हळदी कार्यक्रमात तलवार आणि दोन जांबिया हातात घेऊन नाचणं नवरदेवाला महागात पडलंय. हळदी कार्यक्रमात हा नवरदेव तलवार आणि जांबिया हातात घेऊन बेधुंद नाचत होता.



या नवरदेवाला धारदार शस्त्र हातात घेऊन डान्स करणं चांगलंच अंगलट आलंय. लग्नात लागलेल्या हळदीच्या पिवळ्या हातात नवरदेवाला बेड्या पडल्या आहेत.


औरंगाबादच्या पुंडलिक नगरात हा सगळा प्रकार घडलाय. आरोपींमध्ये नवरदेव बिभीषण शिंदेसह 6 मित्र डान्स करत होते.


याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि या नवरदेवाला पोलिसांनी शोधून त्याला तुरुंगात टाकलं...या सर्वांना न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.