न्यायाधीशांसमोर तंबाखू खाणाऱ्या हेड कॉन्स्टेबलला मिळाली `ही` शिक्षा
अनेकदा काही मग्रुर पोलीस अधिकारी सार्वजनिक ठिकाणांवरील संकेत धुडकावून लावतात.
अहमदनगर: आजपर्यंत आपण पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनमानीचे किंवा स्वैर वर्तणुकीचे अनेक किस्से ऐकले असतील. अनेकदा काही मग्रुर पोलीस अधिकारी सार्वजनिक ठिकाणांवरील संकेत धुडकावून लावतात. मात्र, अहमदनगरमध्ये हीच बाब एका पोलीस कर्मचाऱ्याला चांगलीच महागात पडली. बबन साळवे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. बबन साळवे हे सध्या अहमदनगर जिल्हा न्यायालयात तैनात आहेत. त्यांना तंबाखूचे व्यसन आहे. याच सवयीमुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
न्यायलयीन संकेत पाळण्याची पर्वा नसलेल्या साळवे यांनी न्यायाधीशांसमोरच तंबाखू मळून खाल्ली. ही बाब न्यायाधीशांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना साळवेंना अद्दल घडेल, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीशांनी त्यांना न्यायालयाच्या आवारातील तंबाखू व पानाच्या पिचकाऱ्यांमुळे रंगलेल्या भिंती साफ करण्यास सांगितले आहे. या शिक्षेमुळे नक्कीच न्यायालयाच्या आवारात पान, तंबाखू गुटखा खाणाऱ्यांना चांगलीच जरब बसेल.