औरंगाबाद: परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. शिवसेना त्यांच्या पाठिशी ठामपणे उभी आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. ते रविवारी औरंगाबदमध्ये पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी उद्धव यांनी म्हटले की, शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्यासाठी मी सरकारला भाग पाडेन. केवळ राज्यच नव्हे तर केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. कारण, लोकसभा निवडणुकीच्यावेळी महाराष्ट्रातील जनतेने नरेंद्र मोदी यांना भरभरून मते दिली होती. त्यामुळे केंद्राने आता या शेतकऱ्यांना मदत दिलीच पाहिजे. तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. ही मदत करताना पुरावे मागण्यात वेळ दडवू नये. आम्हाला मत देताना तुम्ही आमचं आधारकार्ड, पॅनकार्ड असे पुरावे विचारलेत का? मग तुम्हाला मदत करतानाही कुठलीही अट मध्ये येणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 


'उद्धव ठाकरेंचं जवळपास ठरलंय; शिवसेनेला १७५ आमदारांचा पाठिंबा'


बँका तुम्हाला नोटीस पाठवत असतील तर शिवसेना तुमच्या पाठिशी उभी राहील. शिवसेना या नोटीशी जाळून टाकेल. तसेच बँकांनाही सोडणार नाही, असे उद्धव यांनी म्हटले.


शरद पवारांची राजकीय उंची मुख्यमंत्रीपदापेक्षा मोठी- संजय राऊत


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी १० हजार कोटींची मदत जाहीर केली होती. मात्र, ही मदत अपुरी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यापूर्वी विरोधकांनीही हाच सूर आळवत किमान २५ हजार कोटींच्या मदतीची मागणी केली होती.