मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतच्या ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.  प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल चर्चा होत असल्याचे सध्या बघायला मिळते. टिझर बघितल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. चित्रपटाचा ट्रेलर १८ डिसेंबरला रिलीज होणार आहे. अंकिता लोखंडे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.  मणिकर्णिकातील एका मुख्य भूमिकेचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटोही अंकिता लोखंडेचाच आहे. या चित्रपटात अंकिता झलकारी बाईच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंकिताचे सेटवरचे २ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या फोटोमध्ये अंकिता घोड्यावर बसली आहे. ‘मणिकर्णिका ’ या चित्रपटामधील झलकारी बाई हे शौर्येवान कॅरेक्टर आहे.  राणी लक्ष्मीबाईंच्या सल्लागार होण्यापर्यंतचा झलकारी बाईंचा प्रवास या चित्रपटात दिसणार आहे. झलकारी बाई या शौर्यवान होत्या आणि राणी लक्ष्मीबाईंप्रमाणे त्यांचे पुतळे सुद्धा उभारले गेले होते.


झाशीच्या राणीच्या रुपात कंगना राणावत या चित्रपटात एका धैर्यवान स्त्रीच्या रुपात प्रेक्षकांना दिसणार आहे. या चित्रपटात कंगना राणावतचे काय डावपेच असणार हे टिझरमध्ये दाखवले गेले


आहे. ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिशने केले आहे. चित्रपटाची कथा केवी विजयेंद्र यांनी लिहिली आहे. या चित्रपटासाठी कंगनाने तलवारबाजी आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतले. कंगना तिच्या येणाऱ्या चित्रपटासाठी उत्सुक आहे. मणिकर्णिका या चित्रपटामध्ये राणी लक्ष्मीबाईंचा लहानपणापासून लग्नापर्यंत त्याचबरोबर इंग्रजांशी युध्दापर्यतची संघर्ष 


दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट अभिनेता ऋतिक रोशनचा ‘सुपर ३०’आणि इमरान हाशमीचा ‘चीट इंडिया’ सोबतच देशात प्रदर्शित होणार आहे.