आता सनी थिरकणार मराठमोळ्या लावणीवर....
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अंतर आता कमी झालं आहे. अनेक मराठी आणि हिंदी कलाकार दोन्ही भाषांच्या चित्रपटांमध्ये सहजतेनं वावरत आहेत. आणि प्रेक्षकांनी देखील ते अगदी आवडीने स्वीकारले आहे.
मुंबई: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अंतर आता कमी झालं आहे. अनेक मराठी आणि हिंदी कलाकार दोन्ही भाषांच्या चित्रपटांमध्ये सहजतेनं वावरत आहेत. आणि प्रेक्षकांनी देखील ते अगदी आवडीने स्वीकारले आहे.
आजकाल अनेक हिंदी कलाकारांना मराठीची गोडी लागण्याचे चित्र दिसत आहे. अशातच अजून एक अभिनेत्रीचा यात समावेश झाला आहे. ती अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी. आता ही बेबी डॉल मराठमोळी लावणी करताना दिसणार आहे.
‘बॉईज’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये सनी ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ या मराठमोळ्या गाण्यावर थिरकताना दिसतेय. आपल्या घायाळ अदांनी प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणाऱ्या सनीचा हा अंदाज सध्या अनेकांचच लक्ष वेधत आहे. या गाण्यात सनीने चक्क गडद भगव्या आणि हिरव्या रंगाची नऊवारी नेसली आहे. या नऊवारीतील पारंपरिक साज कायम ठेवत तिला थोडा स्टायलिश टच देण्यात आला आहे.
‘कुठं कुठं जायाचं हनिमूमला’ आणि ‘मेरा बाबू’ या दोन गाण्यांचं मॅशअपवर सनी लावणीचा ठुमका लावत आहे. सनीची लावणी हे ‘बॉईज’ चित्रपटाचं आकर्षण ठरणार आहे. हे उडत्या चालीचं गाणं सुनिधी चौहानने गायलं आहे.