‘उबुंटू’चा ट्रेलरचा धुमाकूळ
हा ट्रेलर पाहून सिनेमाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
मुंबई : टिझर, टायटल सॉंगमुळे उत्सुकता ताणून ठेवलेल्या ‘उबुंटू’या मराठी सिनेमाचा ट्रेलर सर्वांसमोर आला आहे. हा ट्रेलर पाहून सिनेमाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. या सिनेमामध्ये लहानग्यांची शाळा आणि त्याभोवताली घडणारे प्रसंग पाहायला मिळणार आहेत.
शाळेत जर मन लावून अभ्यास करणारे विद्यार्थी असतील आणि त्याच जोडीला विद्यार्थींमध्ये मिसळून आपलेपनाने ज्ञान देणारे शिक्षक असतील तर आणखी काय हवं. शिक्षक-विद्यार्थी-शाळा यांच्यातील सुंदर नात दर्शविणारा ‘उबुंटू’येत्या १५ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.
अशी आहे टीम
स्वरुप रिक्रिशन अँड मिडीया प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि फेबल फॅक्टरी निर्मित 'उबुंटू' या चित्रपटाची दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखनाची जबाबदारी पुष्कर श्रोत्रीने पेलली आहे. तसेच या चित्रपटाचे संगीतकार श्रीरंग गोडबोले आणि समीर सामंत हे आहेत तर कौशल इनामदार यांनी संगीत दिले आहे.