दीपक भातुसे, मुंबई : राज्यात कोरोनाचं थैमान सुरु असतानाच मंत्रालयातील आणखी एका प्रधान सचिवांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. संबंधित अधिकारी राहत असलेली चर्चगेट इथल्या यशोधन इमारतीचा चौथा मजला सील करण्यात आला आहे. यशोधन इमारतीत राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी राहतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसर्‍या IAS अधिकार्‍याला कोरोनाची लागण झाल्याने मंत्रालयात खळबळ उडाली आहे. या आधी मंत्रालयातील एका प्रधान सचिवांसह सहा जण कोरोना बाधित झाले होते. आता मंत्रालयातील बाधितांचा आकडा सातवर पोहोचला आहे.


यापूर्वी मंत्रालयातील अधिकारी कोरानाबाधित आढळल्यानंतर दोन दिवस मंत्रालय बंद करण्याची वेळ सरकारवर आली होती, त्यावेळी मंत्रालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते.


आतापर्यंत मंत्रालयातील २ प्रधान सचिव, एक उपसचिव, २ सफाई कर्मचारी, एक PWD विभागातील कंत्राटी कामगार आणि मंत्रालयात उभ्या असणार्‍या अ‍ॅम्ब्युलन्समधील डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे.