मुंबई : टाइम्स ऑफ़ इंडियाची आजची बातमी आहे की, नॅशनल हेल्थ प्रोफाईलच्या नव्या आकड्यांनुसार, भारतातचा दरडोई (जीडीपी)चा केवळ एक टक्के खर्च  आरोग्यावर होतो. तर स्वीडन आपल्या जीडीपीचा 9.2 टक्के भाग आरोग्यावर, तर फ्रान्स देखील 8.7 टक्के भाग आरोग्यावर खर्च करतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बातमीत दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन स्कीम (NHPS) लागू करणार आहे. या नुसार १० कोटी गरीब कुटूंबांना ५ लाख रूपये, मेडिकल कव्हर देण्याचं आश्वासन दिलं जात आहे. आकड्यांनुसार २०१५-१६ चा एकूण आरोग्यावर होणारा खर्च हा १४०,०५४ कोटी रूपये होता.


या आधी राजीव गांधी आरोग्य विमा योजनेचा ग्रामीण भागाला, मोठा फायदा होत असताना दिसत आहे, अनेक मोठी ऑपरेशन्स या स्कीमखाली पार पडली आहेत.