मुंबई : महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 114 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. यादरम्यान एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत 26 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात एकूण 2325 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना संकटाच्या काळात पोलीस गेल्या कित्येक दिवसांपासून सतत जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र तैनात आहेत. पोलीस दलातही कोरोनाची लागण होण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या या कोरोना योद्धांना लागण होण्याचं प्रमाण वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 



पोलिसांना कोरोनाची बाधा होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलीस दलात आत्तापर्यंत 11 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित विविध जिल्ह्यांमध्ये 15 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये  पुणे आणि सोलापूरमध्ये  प्रत्येकी दोन तर ठाण्यात एका महिला कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.